महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उपचारानंतर काँग्रेस नेते चिदंबरम यांना एम्समधून डिस्चार्ज - chidambaram in inx media case

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, 30 ऑक्टोबरपर्यंत ते कोठडीतच राहतील. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

चिदंबरम

By

Published : Oct 29, 2019, 9:21 AM IST

नवी दिल्ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पुन्हा ईडीच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. ते सध्या 'आयएनएक्स मीडिया' प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत.

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, 30 ते ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच राहतील. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सीबीआयने म्हटले की, चिदंबरम यांच्याविरोधात दोन साक्षीदारांनी आपला जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवला आहे. चिदंबरम यांना अटकेतून सोडल्यास ते या साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असे या याचिकेत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details