नवी दिल्ली - काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला आहे. 'मोदींनी त्यांच्या कुठल्याही ५ टीकाकारांना निवडावे आणि त्यांच्यासोबत लाईव्ह टीव्हीवर प्रश्नोत्तरे करावीत, असे आव्हान चिदंबरम यांनी टि्वट करत दिले आहे. सध्या देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेणारा नसल्याचे नुकतेच पंतप्रधानांनी एका जाहीर सभेत बोलताना सांगितले होते. यानंतर चिंदबरम यांनी ट्विट करत मोदींना 'चॅलेंज' दिले आहे.
'CAA बाबत टीव्हीवर ५ टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, जनता काय तो निष्कर्ष काढेल' - पंतप्रधान मोदींना आव्हान
पंतप्रधान मोदींनी कुठल्याही ५ महत्त्वाच्या टीकाकारांना निवडावे आणि त्यांच्यासोबत CAA बाबत टेलिव्हिजनवर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. चर्चा ऐकून लोकांना निष्कर्ष काढू द्या', असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
'नागरिकत्व कायदा नागरिकता देण्यासाठी असून काढून घेण्यासाठी नाही. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी आणि तत्कालीन मोठ्या नेत्यांनी पाकिस्तानातील पीडित अल्पसंख्याकांना भारताने नागरिकत्व द्यावे, अशी भूमिका घेतली होती', असे कोलकाता दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदींच्या या वक्तव्यानंतर चिदंबरम यांनी टि्वट करत मोदींवर हल्लाबोल केला. 'पंतप्रधान मोठ्या व्यासपीठावर केवळ भाषण देऊन जातात. मात्र, ते उपस्थितांच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की नागरिकत्व कायद्यानंतर अनेकांना नागरिकत्व मिळू शकणार नाही यामुळं नागरिकत्व जाण्याची भीती आहे', असेही चिदंबरम म्हणाले,
'पंतप्रधान मोदींनी कुठल्याही ५ महत्त्वाच्या टीकाकारांना निवडावे आणि त्यांच्यासोबत CAA बाबत टेलिव्हिजनवर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. चर्चा ऐकून लोकांना निष्कर्ष काढू द्या', असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यावर पंतप्रधान मोदी नक्कीच उत्तर देतील अशी आपल्याला आशा असल्याचे चिदंबरम म्हणाले.