नवी दिल्ली :ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनावरील लसीची क्लिनिकल चाचणी या आठवड्यात सुरू होणार होती. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) याठिकाणी ही चाचणी होणार होती. मात्र, सुरक्षा मंजुरीमुळे ही चाचणी आता एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.
डेटा सेफ्टी अँड मॉनिटरिंग बोर्ड (डीएसएमबी) विभागाच्या सुरक्षा मंजुरीनंतर, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्या १०० स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत डीएसएमबीकडून अद्यापही मंजूरी न मिळाल्याने ही चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे पुढील स्वयंसेवकांची निवडही थांबवण्यात आली आहे. पीजीआयएमईआरमध्ये या चाचण्यांचे मुख्य अन्वेषक डॉ. मधू गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.