महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही अशा कंटेंन्टमेंट झोनमध्ये थोडे निर्बंध शिथील करा- ओवेसी - एआयएमआयएम

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ज्या कंटेन्टमेंट झोनमध्ये गेल्या 15 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही, अशा ठिकाणी थोडे निर्बंध कमी करावेत, अशी मागणी बुधवारी केली आहे

owaisi-seeks-relaxations-in-containment-zones-with-no-new-cases
नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही अशा कंटेंन्टमेंट झोनमध्ये थोडे निर्बंध शिथील करा- ओवेसी

By

Published : Apr 30, 2020, 11:16 AM IST

हैदराबाद- एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ज्या कंटेन्टमेंट झोनमध्ये गेल्या 15 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही, अशा ठिकाणी थोडे निर्बंध कमी करावेत, अशी मागणी बुधवारी केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या घराचा परिसर आणि त्यांचे जवळचे शेजारी हा कंटेन्टमेंट झोन असावा आणि इतर भागातील निर्बंध काही प्रमाणात कमी करावेत, असं ओवेसी यांनी म्हटले आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत एकुण 215 कंटेंन्टमेंट झोन आहेत. त्यापैकी 114 झोन हैदराबाद लोकसभा मतदारसंघात आणि 40 नामपल्ली विधानसभा मतदारसंघात येतात. यापैकी 40 कंटेन्टमेंट झोनमध्ये मागील 15 दिवसांपासून एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. कारवान, मलकपेठ, संतोषनगर, चंद्रयनगुट्टा, चारमिनार, फालकनुमा, मेहदीपट्टणम आणि घोषमहाल यांचा त्यात समावेश आहे.

उर्वरित 74 पैकी 24 कंटेन्टमेंट झोनमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित सापडला नाही याला 15 दिवस पुर्ण होतील. राहिलेल्या 50 कंटेन्टमेंट झोनचे 15 दिवस 3 मेपर्यंत पूर्ण होतील, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केली आहेत.

कंटेन्टमेंट झोनमधील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याबद्दल असदुद्दीन ओवेसी यांनी नगरसेवक, आमदार सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. हैदराबाद महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासनाचे देखील ओवेसी यांनी आभार मानलेत.

ABOUT THE AUTHOR

...view details