नवी दिल्ली - एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवीन संसद स्थापन मागणी केली आहे. नवीन संसद भवनात खासदारांसाठी प्रत्येकी एक दालन तयार करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. एक राष्ट्र एक निवडणूक मुद्द्यावर आयोजीत केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.
ओवैसींची नवीन संसद भवन स्थापन करण्याची मागणी, मोदी म्हणाले विचार करू - aimim
अधिवेशनादरम्यान नेत्यांनी गोंधळ घातला असता त्यावेळी थेट प्रक्षेपण बंद करण्याबाबत विचार करण्याचीही मागणी यावेळी संसद सदस्यांद्वारे करण्यात आली.
आताच्या संसद भवनात सदस्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आवश्यकता पडल्यास सरकारने राष्ट्रपती भवनाची जागा ताब्यात घेऊन नवीन संसद भवन तयार करावे, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी सहमती दाखवली आणि या विषयी विचार करू, असे अश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांची एक बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बैठकीत केवळ एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरच चर्चा न होता संसद आणि संसद सदस्य यांची गरिमा, स्वच्छता-योग अभियानाच्या धर्तीवर जल संधारण कार्यक्रम सुरू करणे, अधिवेशनादरम्यान नेत्यांनी गोंधळ घातला असता त्यावेळी थेट प्रक्षेपण बंद करणे, वेतन - भत्त्यांमध्ये कपात, पक्षांतर करणाऱ्या सदस्यांवर ९० दिवसांच्या आत निर्णय घेणे अनिवार्य करणे, नवीन संसद भवन स्थापन करणे आदी विषयांवरही गंभीर चर्चा झाली. यातील अनेक मुद्यांना पंतप्रधानांनी सहमती दर्शवली.