महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजपाने जरा घटनेचा अभ्यास करायला हवा' ओवैसी यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून सुनावलं - लव्ह जिहादविरोधी कायदा अपडेट

ओवैसी यांनी भाजपाला घटना वाचण्याचा सल्ला दिला. तसेच रोजगार नसलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय, असेही ते म्हणाले.

ओवैसी
ओवैसी

By

Published : Nov 22, 2020, 5:54 PM IST

नवी दिल्ली - हैदराबादमधील नगरपालिका निवडणुकांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. या दरम्यान ओवैसी यांनी लव्ह जिहाद कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. लव्ह जिहादविरोध कायदा घटनेच्या कलम 14 आणि 21 चे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने जरा घटनेचा अभ्यास करायला हवा, अशीही खोचक टीका त्यांनी केली.

असदुद्दीन ओवैसी यांची लव्ह जिहाद कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 व 21चे उल्लंघन होईल. द्वेषाचा हा प्रचार चालणार नाही. जर तुम्ही रात्री एखाद्या भाजपा नेत्याला जागं केलं आणि त्याला काही नावे विचारली तर ते ओवैसी, दहशतवाद आणि शेवटी पाकिस्तान अशी नावे घेतील. तेलंगाणा, विशेषत: हैदराबादला काय आर्थिक मदत दिली हे भाजपाने सांगावे, असेही ओवैसी म्हणाले. इतकेच नव्हे तर ओवैसी यांनी भाजपाला घटना वाचण्याचा सल्ला दिला. तसेच रोजगार नसलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय, असेही ते म्हणाले.

'लव्ह जिहाद'वर कायदा -

देशभरात विविध राज्यांमध्ये लव्ह जिहाद कायद्याविरोधात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आणल्यानंतर आता महाराष्ट्रातही हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त. भाजपा आणि हिंदुत्त्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद कायद्याला मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शवले आहे. मध्य प्रदेश सरकार आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरे आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details