नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, २५ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत १ लाख फ्लाईटमधून १ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.
लॉकडाऊननंतर १ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचा देशांतर्गत विमान प्रवास
२५ मार्चपासून भारतात कोरोनाच्या प्रसारामुळे सर्व नियोजित फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, २५ मार्चपासून देशांतर्गत सेवा सुरू करण्यात आली.
'कोरोना संसर्गापूर्वी देशात जेवढी प्रवासी संख्या होती तेवढी हळूहळू पुन्हा होत आहे. 1 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी १ लाख ८ हजार २१० फ्लाईटद्वारे देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यानंतर प्रवास केला. ही आकडेवारी गाठण्यासाठी सर्वांचे अभिनंदन. आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आपला प्रवास सुरूच राहिल', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
२५ मार्चपासून कोरोनाच्या प्रसारामुळे सर्व नियोजित फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, २५ मार्चपासून देशांतर्गत सेवा सुरू करण्यात आली. तर आंतरराष्ट्रीय विमान सेवाही हळूहळू पूर्ववत करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात विमान सेवा बंद असल्याने विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. सरकारने 'वंदे भारत मिशन' राबवत परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणले. लॉकडाऊन काळात अनेक विमान कंपन्यांनी कर्मचारी आणि पगार कपात केली होती.