नवी दिल्ली -देशभरामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार झाल्यापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. अनेक विद्यापीठांच्या सहामाई आणि वार्षीक परीक्षा खोळंबून पडल्या आहेत. परीक्षा घ्याव्या, की नाही यावर राज्य तसेच केंद्रीय स्तरावर खल सुरु आहे. दरम्यान, 755 विद्यापीठांनी परीक्षेबाबतची स्थिती विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवली आहे.
युजीसीने 6 जुलैला देशातील सर्व शैक्षणिक संस्थाना सहामाई आणि वार्षिक परीक्षा घेण्याबाबत नव्याने नियमावली जारी केली आहे. एकूण 755 विद्यापीठांपैकी 321 राज्य विद्यापीठे, 274 खासगी, 120 स्वायत्त आणि 40 केंद्रीय विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठांनी युजीसीला परीक्षांबाबतची स्थिती सांगितली आहे.