नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात तब्बल 54 लाख 16 हजार 849 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर सर्वांत जास्त लसीकरण उत्तर प्रदेश राज्यात झालं असून 6 लाख 73 हजार 542 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात 4 लाख 34 हजार 943, राजस्थानमध्ये 4 लाख 14 हजार 422, कर्नाटकात 3 लाख 60 हजार 592 लोकांना लस देण्यात आली आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. जगात लसीकरणाची मोहिम भारतामध्ये सर्वांत वेगाने सुरू आहे. गेल्या 21 दिवसात तब्बल 50 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 20 कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून 1 कोटी 8 लाख 14 हजार 304 कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर 1 लाख 54 हजार 918 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 95 जणांचा मृत्यू झाला आहे.