महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आत्महत्येचे सत्र; झारखंडमध्ये लॉकडाऊनदरम्यान दिवसाला सरासरी 5 लोकांची आत्महत्या - आत्महत्येचे सत्र

झारखंडमध्ये कोरोना विषाणूपेक्षा मानसिक उदासीनता अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. लॉकडाऊन काळातील आत्महत्यांची आकडेवारी पाहिल्यास, दररोज आत्महत्या करण्याची संख्या सरासरी 5 एवढी आहे.

आत्महत्या
आत्महत्या

By

Published : Jun 27, 2020, 11:54 AM IST

नवी दिल्ली - विविध कारणांनी होणारे आत्महत्येचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र आहे. झारखंडमध्ये कोरोना विषाणूपेक्षा मानसिक उदासीनता अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. लॉकडाऊन काळातील आत्महत्यांचा डेटा पाहिल्यास, दररोज आत्महत्या करण्याची संख्या सरासरी 5 ऐवढी आहे.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च ते 25 जून पर्यंत 449 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्येच 134 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. दर 4 तास 50 मिनिटांनी एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. लॉकडाऊनमुळे नैराश्याचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे.

लॉकडाऊन काळात सुमारे 1 हजार 200 लोक आमच्या संस्थेमध्ये मानसिक उपचार घेत आहेत. आम्हाला दररोज नैराश्याने ग्रासलेल्या लोकांकडून 150 हून अधिक फोन येत आहेत. 20 टक्के लोक जीवन संपवण्यास इच्छुक होते, असे रांची येथील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ सायकायट्रीमधील डॉक्टरांनी सांगितले.

1 एप्रिल ते 25 जून या कालावधीत राजधानी रांचीमध्ये 55 जणांनी आत्महत्या केली. मनोविकार तज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक मंदी, नोकरी गमावण्याची भीती, बेरोजगारी आणि इतर कारणांमुळे लोकांमध्ये नैराश्य येत आहे. असुरक्षिततेची भावना बर्‍याच लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते.

लॉकडाऊनमुळे लोक घरामध्ये बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि घरगुती हिंसाचार वाढला. या कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले. योग्य समुपदेशनामुळे बरेच जण वाचू शकले असते, असे मानसशास्त्रज्ञ अजय कुमार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details