धर्मशाळा - हिमाचल प्रदेशातील महाराणा प्रताप सागर धरणात हिवाळ्यामुळे ४५ हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत आहे. या धरणाला पाँग लेक असेही म्हणतात.
रशिया आणि मध्य आशियातून आले भारतात

पाँग धरणात सुमारे ४५ हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पक्षांची संख्या वाढणार असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. रशियातील सैबेरिया आणि मध्य आशिया भागातून हे पक्षी आले आहेत. एप्रिल महिन्यात हे पक्षी पुन्हा परतीच्या प्रवास करतील. रुडिशेल बदक, गुल्स, हंस आणि एव्हियन प्रजातीचे पक्षी धरण प्रदेशातील दलदलीच्या प्रदेशात उतरले आहेत.
पक्षांच्या सुरक्षेसाठी अधिकारी तैनात
या पक्षांच्या सुरक्षेसाठी वनविभागातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पर्यटकही मोठ्या संख्येने येत असल्याने धरण क्षेत्र गर्दीने फुलले आहे. या पक्षांची तस्करी होण्याचीही शक्यता असते. त्यावरही वन विभाग लक्ष ठेवून आहे. धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. मागील वर्षी सुमारे १ लाखांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.