श्रीनगर :जम्मू-काश्मीरमध्ये सध्या २७०हून अधिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. २०१९ आणि २०२०च्या आकडेवारीपेक्षा ही संख्या कमी असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या कमी..
या भागामध्ये दहशतवादी कारवाया, घुसखोरी आणि नागरिकांच्या हत्येमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. २०२०मध्ये सुरक्षा दलांनी १००हून अधिक यशस्वी दहशतवादी विरोधी कारवाया करत २२५ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असेही सूत्रांनी सांगितले. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या एकूण दहशतवाद्यांपैकी २०५ दहशतवादी काश्मीर खोऱ्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.