जयपूर - राजस्थानातील बुंदी जिल्ह्यात बस नदीत कोसळल्याने २४ जण ठार झाले आहेत. कोटा-डोसा महामार्गावर हा अपघात झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख तर जखमी व्यक्तीला प्रत्येकी ४० हजार रुपये मदतीची घोषणा राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
राजस्थान: लग्न समारंभावरून परतणाऱ्या वऱ्हाडींची बस नदीत कोसळली, २४ जणांचा मृत्यू - बस नदीत कोसळली बुंदी
चालकाला झोप लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार आत्तापर्यंत २४ मृतदेह सापडले आहेत.
बस दरीत कोसळली
बसमधील सर्वजण लग्न समारंभ उरकून सवाई माधवपूर येथे येत होती. यावेळी बस नदीत कोसळल्याने २४ जण ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ५० ते ६० प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
चालकाला झोप लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून बस मेज नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लाखेरी विभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
Last Updated : Feb 26, 2020, 8:33 PM IST