जयपूर- राजस्थान पोलिसांनी डुंगरपूर हिंसाचारप्रकरणी सुमारे १०० जणांना अटक केली आहे. रखडलेली शिक्षक भरती तत्काळ घ्यावी, या मागणीसाठी डुंगरपूर जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, या आंदोलला हिंसक वळण लागले होते. आंदोलक परीक्षार्थ्यांनी जाळपोळ करत हिंसाचार केला होता.
राजस्थान : डुंगरपूर हिंसाचाराप्रकरणी १०० जणांना अटक, सातशेपेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हा दाखल - राजस्थान दंगल बातमी
शिक्षक भरती तत्काळ घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र, मोठ्या संख्येने जमलेल्या उमेदवारांचा जमाव हिंसक झाला होता. रस्त्यावरील अनेक गाड्या त्यांनी पेटवून दिल्या होत्या.
२६ सप्टेंबरला पोलिसांनी बिच्चिवारा पोलीस ठाण्यात हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत सातशेपेक्षा जास्त व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दंगलखोरांना अटक करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फूटेज तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माध्यम प्रतिनिधींकडील व्हिडिओ, छायाचित्रांचा आधार घेतला आहे.
शिक्षक भरती तत्काळ घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र, मोठ्या संख्येने जमलेला जमाव हिंसक झाला होता. रस्त्यावरील अनेक गाड्या उमेदवारांनी पेटवून दिल्या होत्या. आंदोलनानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निर्देशानुसार आदिवासी विकास मंत्री अर्जुन सिंग बामीयान यांनी आंदोलकांची भेट घेतली.