नवी दिल्ली - देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भाराताने आतापर्यंत तब्बल 1 कोटी कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजार 596 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 1 कोटी 4 हजार 101 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्या ह्या 1 हजार 105 प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. 778 सरकारी, 317 खासगी, आरटी-पीसीआर 592, ट्रूनॅट 421 आणि सीबीएनएएटी 92,या प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.