महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नासाच्याआधी इस्त्रोने विक्रम लँडरचा शोध लावला - सिवन - ISRO

नासाच्या अगोदरच चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रम लँडरचे अवशेष भारताला सापडले होते, असे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे (इस्रो) प्रमुख के.सिवन यांनी सांगितले आहे.

सिवन
सिवन

By

Published : Dec 4, 2019, 10:03 AM IST

बंगळुरू -अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने भारतीय विक्रम लँडरचे अवशेष सापडले असल्याचे टि्वट मंगळवारी केले होते. त्यानंतर नासाच्या अगोदरच चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रम लँडरचे अवशेष भारताला सापडले होते, असे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे (इस्रो) प्रमुख के.सिवन यांनी सांगितले आहे. यासंबधीत सर्व माहिती ईस्त्रोच्या वेबसाईटवर टाकली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा(इस्त्रो) महत्त्वकांक्षी चंद्रयान 2 ही मोहिम विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने अडचणीत आली. या मोहिमेबाबत नासाने मंगळवारी एक नवीन खुलासा केला. नासाला विक्रम लँडरची काही छायाचित्रे मिळाली असल्याची माहिती नासाने आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून ट्विट करून माहिती दिली.


नासाच्या 'लुनार रिकॉनिसेंस ऑर्बिटर'ने ही छायाचित्रे घेतली आहेत. यामध्ये विक्रम लँडरचे ज्या जागी हार्ड लँडिंग झाले त्या जागेची ही छायाचित्रे आहेत. लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाच्या ईशान्येला सुमारे 750 मीटर अंतरावर काही अवशेष आढळले आहेत. नासाने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये हिरवे ठिपके लँडरचे तुकडे दर्शवत असून निळे ठिपके हार्ड लँडिंगमुळे जमिनीला पडलेले खड्डे दर्शवत आहे. लँडरचे मोडतोड झालेले अवशेष दिसत आहेत. सात सप्टेंबरला विक्रम लँडरचा लँडिंगच्या काही मिनीटे अगोदर पृथ्वीशी संपर्क तुटला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details