भुवनेश्वर - प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. मात्र, तरीही लोकांमध्ये पाहीजे तेवढी जागरुकता झालेली नाही. अजूनही प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो. ओरिसामधील एका उच्च विद्याविभूषित तरुणाने प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे. बालासोर जिल्ह्यामधील अभिमन्यू मिश्र नावाच्या तरुणाने प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. अभिमन्यूने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असूनही तो कचरा गोळा करायचे काम करतो.
प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचललेला इंजिनिअर तरुण हेही वाचा -'अमित शाहजी तुम्ही मित्र कसे गमवावे यावर पुस्तक लिहू शकता', ओवेसी यांची टीका
चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्याची अपेक्षा सर्वजण करतात. मात्र, अभिमन्यूने या विचाराला फाटा देत प्लास्टिक गोळा करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून तो प्लास्टिक गोळा करण्याचे काम करत आहे. हे काम करत असताना लोकांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी त्याने संपूर्ण अंगावर प्लास्टिकच्या बाटल्या बांधल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक त्याला मानसिक रुग्ण म्हणून चिडवतात.
लोकांना प्लास्टिक वापराचे दुरुपयोग सांगून जागरुक करणे हा माझा उद्देश आहे. लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी मी अंगाभोवती प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर सामान लटकवतो. वेगळा दिसत असल्याने लोक माझी चेष्टा करतात, असे त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. अभिमन्यू अनेक खासगी आणि स्वयंसेवी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्येही सहभागी होतो.
हेही वाचा -कर्नाटकातील 'हरितदूत'; एक एकर जमिनीवर उभे केले जंगल
अभिमन्यू मिश्र सारखे समाजसेवक स्वत:च्या फायद्यासाठी नव्हे तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक दिवस काम करतात. फक्त जबाबदारी म्हणून नाही तर पर्यावरणाला काहीतरी माघारी देण्याच्या भावनेतून काम करतात. लोकांनी एकत्र येवून काम करण्यासाठी अभिमन्यू सारख्या व्यक्तींकडून प्रोत्साहन मिळते.