महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत- चीन सीमा वाद: पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? काँग्रेसचा सवाल

गलवान व्हॅली परिसरातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच हाणामारीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा दोन्ही सैनिकांमध्ये हाणामारी झाली, यात दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे. यावरून काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे.

रणदिप सुरजेवाल
रणदिप सुरजेवाल

By

Published : Jun 16, 2020, 8:25 PM IST

Updated : Jun 16, 2020, 8:39 PM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान भागात भारत चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱयासह दोन जवानांना विरमरण आले. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप हा सर्व प्रकार काहीही न करता शांतपणे पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाल यांनी केला आहे.

गलवान व्हॅली परिसरातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा दोन्ही सैनिकांमध्ये हाणामारी झाली, यात दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे. लडाखमधील तीन ठिकाणी एप्रिल/ मे पासून चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. हा चिंतेचा विषय पुढे असताना मोदी सरकार शांतपणे सर्वकाही पाहत आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाल म्हणाले.

चीनने भारताची किती जमीन हडपली सरकारने सांगावे

सरकारने पुढे होऊन सांगावे की, चीनने भारताची किती जमीन हडपली आहे. देशाच्या एकात्मतेला आणि सुरक्षेला निर्माण झालेला गंभीर धोका सरकार कसा हाताळणार? असे सुरजेवाल म्हणाले.

देशाच्या एकात्मता आणि सुरक्षेला धोका

चीन हजारो सैनिकांना गलवान व्हॅली आणि प्योंगयांग त्सो लेक भागात आणत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. हा भारताच्या प्रादेशिक एकात्मतेवर घाला आहे. मागील पाच दशकात एकाही भारतीय सैनिकाचा जीव गेला नव्हता. त्यामुळे आपल्या शुर सैनिकांची हत्या केल्याची घटना धक्कादायक, भयानक आणि कधीही मान्य करण्याजोगी नाही, असे सुरजेवाल म्हणाले.

मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गप्प का?

संपूर्ण देशात भीती पसरवणाऱ्या आणि त्रासदायक घटनेनंतरही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले आहेत. सरकारने या बातमीची खात्री करावी, आणि जर हे खरे असेल तर मोदी आणि संरक्षण मंत्री शांत का बसले आहेत? असा प्रश्न केला.

अधिकृत वक्तव्य 16 मिनिटातच का बदलले?

लष्कराने जारी केलेल्या वक्तव्याचा हवाला देत सुरजेवाल यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर चीनी सैनिक गलवान भागातून माघारी जात होते, तर आपल्या सैनिकांची हत्या कशी करण्यात आली, सरकार नागरिकांना विश्वासात घेवून याबद्दल काही सांगेल का? जर काल रात्री ही घटना घडली असेल तर दुसऱ्या दुपारी दुपारी 12.52 वाजता का उघड करण्यात आली? तसेच 16 मिनिटांतच वक्तव्य बदलण्यात आले? यावरून सुरजेवाल यांनी प्रश्न उपस्थित केले.

Last Updated : Jun 16, 2020, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details