नवी दिल्ली -लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना धारेवर धरले आहे. एवढं सगळ होऊनही अजूनपर्यंत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी मौन सोडले नाही. तसेच या प्रकरणी पंतप्रधानांनी देशाला आत्मविश्वास देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भारतीय लष्करांच्या वतीने सुरुवातील सांगण्यात आले होते की, दोन जवान आणि एक अधिकारी हुतात्मा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्री भारतीय लष्कर आणि चीनी सैन्यांमध्ये हल्ला झाला. यात देशाच्या 17 जवानांना वीर मरण तर इतर जवान जखमी झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जवान हुतात्मा झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, हुतात्मा जवानांबद्दल आदरांजली व्यक्त करून कुटुंबाच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत. हुतात्मा जवानांचे बलीदान वाया जाणार नाही. भारतीय लष्करासोबत उभा राहण्याची वेळ असून, देशाची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.