महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रणव मुखर्जी यांनी ईव्हीएम छेडछाडीवर व्यक्त केली चिंता - Pranab Mukherjee

निवडणुक आयोगाने मतदान प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी ईव्हीएमच्या छेडछाडीवर चिंता व्यक्त केली आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवणे ही पूर्णपणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली

By

Published : May 21, 2019, 6:52 PM IST

नवी दिल्ली - निवडणुक आयोगाने मतदान प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी ईव्हीएमच्या छेडछाडीवर चिंता व्यक्त केली आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवणे ही पूर्णपणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

‘मतदारांनी कौल दिलेला असून त्याच्याशी छेडछाड केली जात असल्याच्या वृत्ताने मला चिंता लागली आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी आयोगाची आहे’, लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी आपण कोणतीही तडजोड करू शकत नाही. देशातील जनतेचा या शासकीय संस्थांवरील विश्वास कमी होता कामा नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

याआधी प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य पद्धतीने २०१९ च्या लोकसभा निवडणुका घेतल्या. विविध निवडणूक आयुक्तांनी योग्य पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली अशा शब्दात आयोगाचे सोमवारी कौतुक केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details