तिरुवनंतपूरम - केरळमध्ये आत्तापर्यंत कोरोना बाधित १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोरोनाचा फटका न्याय व्यवस्थेलाही बसल्याचे दिसून येत आहे. फक्त महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी घ्यावी, इतर कमी महत्त्वाचे खटले लांबणीवर टाकण्यात यावेत, अशी नोटीस उच्च न्यायालयाच्या निबंधकाने (रजिस्ट्रार) काढली आहे.
हेही वाचा -ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि पत्नी कोरोना बाधित
ही नोटीस राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांना पाठविण्यात आली आहे. न्याय देण्यास उशीर होत असल्याची ओरड आधीपासूनच भारतात होत आहे. त्यात कोरोनाने खीळ घातली आहे. प्रत्येक जिल्हा न्यायालयात प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे आरोग्य ध्यानात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -कोरोना : भारतात ६८ जणांना कोरोना संसर्ग; सर्व पर्यटक व्हिजा रद्द
काल केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी कडक निर्बंध लागू केले आहे. परदेशवारी केल्याची माहिती लपविणे हा गुन्हा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.