बंगळुरू -कर्नाटक राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होते आहे. अशा परिस्थितीत फक्त देवच राज्याला वाचवू शकतो, असे वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. मात्र, टीका झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे श्रीरामुलू यांनी म्हटले.
सरकार कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास कमी पडत असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. बुधवारी आरोग्य मंत्र्यांनी राज्याला कोरोनापासून देवच वाचवू शकतो, असे वक्तव्य चित्रदुर्ग जिल्ह्यात केले होते. मात्र, माध्यमांमध्ये यासंबंधी वृत्त आल्यानंतर श्रीरामुलू यांनी युटर्न घेतला. काही ठराविक माध्यमांनी माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने ते म्हणाले.