नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार, डिजीटल मीडियातील चित्रपट, मालिका आणि बातम्या या सर्वांवर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर राहणार आहे. शासनाने याबाबत ९ नोव्हेंबरला एक अधिसूचना जारी केली होती, ज्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
यासाठी १९६१साली लागू करण्यात आलेल्या 'व्यवसायाचे वाटप नियमां'मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणांची तातडीनेअंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. या कायद्यामुळे आता माहिती आणि प्रसारण मंत्रालय डिजीटल मीडियातील बातम्यांवर नजर ठेऊ शकणार आहे. तसेच अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स अशा प्रकारच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट, वेब सीरीज अशा सर्व गोष्टींवर अंकुश ठेऊ शकणार आहे.