महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID -19 : मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, संगणकाअभावी ऑनलाईन वर्ग 'नापास' - Unlock 4 News

'कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडल्या आहेत. याचा जगभरातील 154 कोटी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे,' असे संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) म्हटले आहे.

ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण

By

Published : Sep 3, 2020, 1:34 PM IST

जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध संस्था, शिक्षण व्यवस्था, आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर राखणे कठीण होत असल्यामुळे खबदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. यावर ऑनलाईन क्लासेसचा पर्याय समोर आला होता. मात्र, याच्या अंमलबजावणीतही अनेक अडचणी येत आहेत. याच संदर्भातील स्थितीचा आढावा...

भारतीय स्थिती

भारतीय शिक्षण व्यवस्था जगातील सर्वांत मोठ्या व्यवस्थांपैकी एक असून येथे दीड दशलक्षाहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेले 8.5 दशलक्ष शिक्षक आणि 250 दशलक्ष मुले यामध्ये आहेत.

अनलॉक 4.0 : शाळा, महाविद्यालये सप्टेंबरपासून पुन्हा उघडणार? आपल्याला काय माहीत असणे आवश्यक आहे?

  • जास्तीत जास्त सुरक्षा आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की, शाळेतील आणि महाविद्यालयांतील सर्वच इयत्ता एकाच दिवशी सुरू होणार नाहीत.
  • 3 मार्चपासून शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला आहे.
  • सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु योग्य व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे आणि विशेषत: ग्रामीण भागात स्मार्टफोनची असमान उपलब्धता असल्यामुळे हा उपाय प्रभावीपणे राबवता आला नाही.
  • शिक्षण शुल्कात सवलत न मिळाल्याबद्दल पालकांनीही आक्षेप नोंदविला आहे.

ऑनलाईन वर्गांबाबत गुजरातमधील स्थिती

  • कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान, गुजरात सरकारने 28 मार्चला 'घरातून अभ्यास' हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतून सरकारी शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या सुमारे 61 टक्के विद्यार्थ्यांना वगळले गेले.
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून आठ आठवड्यांच्या अध्यापनाची मोहीम 43.23 लाखांहून अधिक प्राथमिक सरकारी शाळांमध्ये 28 मार्चला सुरू करण्यात आली. यात तिसऱ्या ते नवव्या इयत्तेदरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि गुजरातीचे वर्ग घेण्यात आले.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी 35.84 पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्या पालकांकडे स्मार्ट फोन्स आहेत, त्यांच्यापैकी 13.26 पालक इंटरनेटचा वापर करत नाहीत, अशी आकडेवारी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात अशा अनेक समस्या आहेत.
  • सध्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये गरीब कुटुंबांतील 16 लाख मुले सरकारी आणि पालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या सर्वांना मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, संगणक याअभावी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर, कोरोना लॉकडाऊन काळात खासगी शाळांमध्ये शिकणारी काहीशी सधन वर्गातील मुले त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ऑनलाईन वर्गांमध्ये सहभागी होत आहेत.

आंतरराष्ट्रीय समस्या

'कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडल्या आहेत. याचा जगभरातील 154 कोटी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे,' असे संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details