हैदराबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भाजप पुन्हा सत्तेत आले. मोदी सरकारच्या या दुसऱ्या पर्वाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात भाजपने केलेली काही प्रमुख आश्वासने, आणि सरकारने घेतलेले काही प्रमुख निर्णय...
- कलम ३७०...
पाच ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. तसेच, या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली. भाजपने आपल्या 'संकल्प पत्रा'मध्ये या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
- २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची मिळकत करणार दुप्पट...
भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी महत्त्वाचे आश्वासन म्हणजे, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची कमाई दुप्पट करणार.
हे कसे साध्य होणार याबाबत २०१६मध्ये शेती आणि ग्रामीण विकासासाठी असलेल्या राष्ट्रीय बँकेने एक अहवाल सादर केला होता. तसेच २०१७मध्ये यासाठी नीती आयोगाने स्वतःचा वेगळा अहवाल सादर केला. मात्र, आकडेवारी पाहिली असता, २०१८च्या ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न हे गेल्या १४ वर्षांतील सर्वात कमी उत्पन ठरले. मार्चमध्ये इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली होती.
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ८.५२ कोटी शेतकऱ्यांना सुमारे ६२,४६९ कोटी रुपये मिळाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
- 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणार भारत...
२०३० पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचे आश्वासन देत भाजपने नवभारताची संकल्पना मांडली होती. तसेच, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स आणि २०३२ पर्यंत १० ट्रिलियन डॉलर्स एवढी करण्याचे आश्वासनही भाजपने दिले होते.
मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या एका अहवालात समोर आले, की देशाची २०१९मधील आर्थिक प्रगती, ही निर्धारित ६.१ टक्के नसून, केवळ ४.८ टक्केच झाली.
- असंविधानिक कारवाया (प्रतिबंध) कायदा...
केंद्रसरकारने या कायद्याचा प्रस्ताव मांडला, आणि संसदेने तो २०१९मध्ये पारित केला. असंविधानिक कारवाया (प्रतिबंध) कायद्यामध्ये केलेल्या सुधारणांमुळे केंद्र सरकारकडे एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करुन, त्याची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आला. तसेच, या दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तीला प्रवास करण्यापासून रोखण्याचा हक्कही केंद्राला प्राप्त झाला.
- तीन तलाक...