चकमक ; जम्मू काश्मीरात भारतीय जवानांनी दहशतवाद्याला घातले कंठस्नान - जम्मू काश्मीर
भारतीय जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
श्रीनगर- शोपीयानमध्ये भारतीय जवानासोबत दहशतवाद्यांची चकमक उडाली. या चकमकीत भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
शोपीयान येथे गस्तीवर असताना लष्करी जवानांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. त्यामुळे भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. मात्र ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.