महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बडगाममध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; ऑपरेशन सुरूच - encounter

गेल्या २४ तासांमधील ही दुसरी चकमक आहे. सध्या ऑपरेशन सुरू आहे.

बडगाममध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; ऑपरेशन सुरू

By

Published : Jun 30, 2019, 9:36 AM IST

श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. गेल्या २४ तासांतील ही दुसरी चकमक आहे. अद्यापही ऑपरेशन सुरूच आहे.

बडगाम जिल्ह्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात पहाटेपासूनच शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमधील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी शनिवारी पहाटे बडगाम जिल्ह्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी गावात शोधमोहीमेला सुरुवात केली. यादरम्यान झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details