रायपूर - छत्तीसगडमधील खरसिया पोलीस ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील नदीमध्ये एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना फेकले आणि त्याच नदीत स्वतःही उडी मारली आहे. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून सर्वांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणीही सापडले नसल्याची माहिती आहे.
धक्कादायक! पोटच्या तीन मुलांना पित्यानेच फेकले नदीत ; स्वतःही मारली उडी - रायगड खरसिया मुलांना नदीत फेकले
खरसिया पोलीस ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील नदीमध्ये एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना फेकले आणि त्याच नदीत स्वतःही उडी मारली आहे. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून सर्वांचा शोध घेत आहेत.
![धक्कादायक! पोटच्या तीन मुलांना पित्यानेच फेकले नदीत ; स्वतःही मारली उडी रायपूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:07:11:1597567031-cg-rai-01-panimekuda-avb-7203904-16082020131004-1608f-1597563604-1063.jpg)
खरसियाच्या डोमनाराजवळील एडु पुलिया येथील 40 वर्षीय कार्तिकेश्वर राठियाने आपल्या 8 महिन्यांच्या, 3 वर्षाच्या आणि एका वर्षाच्या मुलांना एक-एक करून नदीत फेकले. कार्तिकेश्वर राठिया एसईसीएलमध्ये काम करत होता. तो काही दिवसांपासून तणावाखाली होता, अशी माहिती मिळाली आहे.
कार्तिकेश्वर राठिया रविवारी आपल्या चार मुलांना घेऊन दुचाकीवरून फिरण्यासाठी बाहेर गेला होता. सर्वच मुलांना घेऊन बाहेर पडल्याने कार्तकेश्वरवर पत्नीला संशय आला. त्यांच्या शोधात ती मांड नदीच्या ओढ्याजवळ पोहचली. यावेळी एका मुलाने आईकडे धाव घेत तिला मिठी मारली. त्याचवेळी कार्तिकेश्वर राठियाने उर्वरित तीन मुलांना वाहत्या नदीत एक-एक करुन फेकले आणि स्वतः नदीत उडी मारली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.