चेन्नई- भारतात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असताना, तामिळनाडूमध्येही एक रूग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य सचिव बीला राजेश यांनी रविवारी ही माहिती दिली.
राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये हा रूग्ण आढळून आला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, की सरकारतर्फे शाळा-महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही सुरू आहे. आतापर्यंत ५७ विमानांमधून आलेल्या ८,५०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.