पाटणा- केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी सोमवारी 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेची घोषणा केली. देशभरात ही योजना एक जूनपासून लागू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या योजनेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे रेशन कार्ड घ्यावे लागणार नाही. रेशन कार्ड धारकांना, एकाच कार्डवर देशभरात कुठेही असताना लाभ घेता येणार आहेत, अशी माहिती पासवान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याआधी एक जानेवारीला पासवान यांनी ही योजना देशातील १२ राज्यांमध्ये सुरू केली गेली असल्याचे जाहीर केले होते.