भूवनेश्वर - ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७० वर पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी ओडिशामध्ये एकूण ३ हजार ३५३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ओडिशामध्ये आत्तापर्यंत एका दिवसात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीचा हा आकडा सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आत्तापर्यंत आरोग्य विभागातर्फे ४४ हजार ६६३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.