श्रीनगर -पांथा चौक परिसरामध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त शोध पथकावर दहशतवाद्यांनी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले असून तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आले आहे. काल (शनिवार) पासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
या परिसरात पोलीस आणि सीआरपीएफ पथकाची संयुक्त शोधमोहीम सुरू आहे. दबा धरून बसलेले दहशतवादी या पथकावर हल्ला करत आहेत. जवानांकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले असून एक पोलीस अधिकारी एएसआय बाबूराम यांना वीरमरण आले आहे.