महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये एक लाखाचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा - sukma

वंजम बुधू या माओवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या घटनेविषयी सुकमाचे पोलीस अधिक्षक शालभ सिन्हा यांनी माहिती दिली.

माओवादी

By

Published : Jun 27, 2019, 10:17 PM IST

सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या चकमकीत एका माओवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. वंजम बुधू असे या माओवाद्याचे नाव होते. याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. तो निलामाडगु क्रांतिकारी लोक समितीचा प्रभारी व जन मिलिशियाचा कमांडर होता. डीआरजीच्या जवानांनी चकमकीदरम्यान त्याला यमसदनी धाडले.

या घटनेविषयी सुकमाचे पोलीस अधिक्षक शालभ सिन्हा यांनी माहिती दिली. 'मुरलीगुडा आणि अटकल भागातील जंगलात माओवादी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही डीआरजीचे पथक या भागात शोध घेण्यासाठी पाठवले होते. लपलेल्या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यापैकी एकाला यमसदनी धाडण्यात आले. जवानांना या नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्र, औषधांसह शस्त्रक्रियेच्या सामानाच्या पिशव्या देखील हस्तगत करण्यात आल्या,' असे ते म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details