कोलकाता- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर आणखी एक तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने गावामध्ये पाहणी करून, विलगीकरण उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावरून गावऱ्यांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली. यामुळे चर्चेचे वादामध्ये आणि वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यातच काही लोकांनी गोळीबार केला, तर काहींनी चक्क गावठी बॉम्बही फेकले.