पुंछ (जम्मू काश्मीर) -पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जिल्ह्यातील मेंधार सेक्टरमध्ये मोर्टार डागल्याने एक नागरिक जखमी झाला आहे. वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानकडून पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन; एक नागरिक जखमी - Jammu and Kashmir
पुंछ जिल्ह्यातील मेंधार सेक्टरमध्ये मोर्टार डागल्याने एक नागरिक जखमी झाला आहे. वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शस्त्रसंधीचे उल्लघंन
पाकिस्तानकडून रात्री 2 वाजता मेंधार सेंक्टर आणि बालाकोट परिसरात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर 2. 45 ला गोळीबार थांबला. गेल्या आठवडाभरात बालाकोट सेक्टरमधील ही दुसरी घटना आहे.
नोव्हेंबर 2003 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी लागू झाली होती, परंतु पाकिस्तान वारंवार त्याचे उल्लंघन करत आहे. सुरक्षा यंत्रणांनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तान गोळीबाराचा वापर करतो.