महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक, शस्त्रसाठा जप्त - काश्मीर बातमी

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Oct 6, 2019, 1:12 PM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये जैश -ए - मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. बारामुल्ला जिल्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - व्यापार बंद पाडण्यासाठी काश्मीरात दहशतवाद्यांनी जाळला ट्रक

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दहशतवाद्याची कसून चौकश करण्यात येत आहे. जैश- ए- मोहम्मद ही आंतराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यामध्ये या संघटनेचा मोठा हात आहे.

हेही वाचा - अरुणाचलमध्ये सर्वांत मोठा 'हिम विजय' सुरू, युद्ध अभ्यासाचा चीनने केला विरोध

काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी गटांनी कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तानचे लष्करही दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत करत आहेत. काश्मीर अंशात ठेवण्यासाठी सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर लष्कराने खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मागील दीड महिन्यांच्या काळात नियंत्रण रेषेवर गोळीबाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details