त्रीशूर - केरळ राज्यात सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओणम साजरा करण्यात येत आहे. 'पूली काली' म्हणजेच वाघाचा नाच करून हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी विशेषता पूरष शरिरावर वाघाचे चित्र काढून रस्तावर उतरून नाचतात. दरम्यान, यंदा कोरोनाचे सावट असल्याने सगळीकडे अनेक निर्बंधांमध्ये हा सण साजरा करण्यात येत आहे. तसेच पूलीकाली नाच कुठेच पहायला मिळणार नाही. मात्र, अशातही एक समूह असा आहे, जो वेगळ्यापद्धतीने हा सण साजरा करत आहे.
जिल्ह्यातील अय्यांथोले येथे पुलीकोट्टम नावाचा एक समूह आहे. हा समूह वाघाचा नाच करणारा समूह म्हणून प्रसिद्ध आहे. पण फक्त वाघाचा नाच न करता, हा समूह वेगळ्यापद्धतीने ओणम साजरा करत आहे. दरवर्षी या कालावधीत केरळमध्ये पूरस्थित असते. यापूरस्थितीच्या काळात नागरिकांचा बचाव होण्यासाठी हा समूह बोटी तयार करत असतो. या बोटींच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांचा जीव वाचलेला आहे. यंदा मात्र, परिसरात पूरस्थिती उद्धभवलेली नसली तरी पुलीकोट्टम समुहाचे वाघ बोटी बनवण्याचे काम करत आहेत. परिसरात कुठेही पूर आल्यास त्यांनी तयार केलेल्या बोटी कामात येतील, असा आशावाद त्यांनी आजच्या दिवशी व्यक्त केला आहे.