महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगड राज्य स्थापना दिन : विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

छत्तीसगड राज्य स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यता आले.

मुख्यमंत्री बघेल
मुख्यमंत्री बघेल

By

Published : Nov 1, 2020, 10:47 PM IST

रायपूर (छत्तीसगड)-राज्याच्या 20 व्या स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध योजनांचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजीव गांधी किसान न्याय योजनेंतर्गत तिसरा हप्त्याची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. यासह स्वामी आत्मानंद इंग्रजी माध्यम शाळा, मुख्यमंत्री शहरी स्लम स्वास्थ्य योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.

बोलताना मुख्यमंत्री बघेल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्योत्सव-2020 का वर्च्युअल शुभारंभ दोन टप्प्यात पार पडले. पहिल्या टप्प्यात दुपारी 12 ते एक वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनि विविध योजनांचे शुभारंभ केले. दूसऱ्या टप्प्यात दुपारी दीड वाजल्यापासून सन्मान समारोह, राम वनगमन पथ टुरिझम सर्किटचे उद्घाटन आणि फोर्टिफाइड राइस वितरण योजनाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील 8 हजार 226 शिक्षकांना सन्मान करण्यात आला.

बोलताना मुख्यमंत्री बघेल

मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगड राज्य स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर 'छत्तीसगड विचार माला' विमोचन केले. जनसंपर्क विभागाकडून छत्तीसगड विचार माला 'गढबो नवा छत्तीसगड'च्या अंतर्गत 9 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांमध्ये 'हमारे राम', 'हमारे बापू', 'न्याय विरासत और विस्तार', 'पहल', 'सम्बल', 'आवश्यकता: बोधघाट महत्ता इन्द्रावती', 'जनगणमन की विजयगाथा मनरेगा' आणि 'लोकवाणी आपकी बात मुख्यमंत्री भूपेश बघेल के साथ', 'जय हिन्द-जय छत्तीसगड', या पुस्तकांचा समावेश आहे.

बोलताना मुख्यमंत्री बघेल

राज्योत्सवात राहुल गांधींची हजेरी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधा भाषण केले. ते म्हणाले, पंतप्रधानांनी या कायद्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली. छत्तीसगड, पंजाब आणि बिहारची जनभावनेनंतर पंतप्रधानांना या कायद्याबाबत पुन्हा विचार करावाच लागणार आहे.

हेही वाचा -बिहार विधानसभा निवडणूक : कन्हैय्या कुमारचा नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details