नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या प्रती जाळत सीमेवरच लोहरी सण साजरा केला. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदरच इशारा दिला होता. त्यामुळे, खबरदारी म्हणून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलीये कायद्यांना स्थगिती..
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कृषी कायद्यांविरोधातील याचिकांवर निकाल देत, कृषी कायद्यांवर स्थगिती लागू केली. तसेच, हा वाद सोडवण्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.