नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून देशात विमान सेवा बंद होती. मात्र, २५ मेपासून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत 41 हजार 673 प्रवाशांना घेऊन 608 विमानांनी उड्डाणे भरली. संपूर्ण दिवसभरात सुरळीत कामकाज पार पडल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगतिले.
देशांतर्गत उड्डाण सुरू.. दुसर्याच दिवशी 41,673 प्रवाशांनी केला विमान प्रवास
मंगळवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत 41 हजार 673 प्रवाशांना घेऊन 608 विमानांनी उड्डाणे भरली. संपूर्ण दिवसभरात सुरळीत कामकाज पार पडल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगतिले.
मंगळवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत 41 हजार 673 प्रवशांना घेऊन विमानतळावर 283 विमानांचे आगमन आणि 325 विमानांचे प्रस्थान झाले. अम्फान वादळामुळे स्थगित करण्यात आलेल्या आंध्र प्रदेशमधील प्रवासी विमान वाहतूक २६ मेपासून, तर पश्चिम बंगालमधील २८ मेपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील इतर विमानतळांच्या एक तृतीयांश विमान वाहतूक मुंबईमधील विमानतळावरून करण्यात येत आहे.
प्रवासासाठी काही मार्गदर्शकतत्वे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आले आहेत. विमान उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल. तसेच प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल, आदी सूचना यामध्ये आहेत.