महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक - माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केले कौतुक

कोरोनाबाबत महाराष्ट्रातील परिस्थिती योग्यरितीने हाताळत असल्याबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

माजी मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री

By

Published : Apr 5, 2020, 5:46 PM IST

श्रीनगर - कोरोनाबाबत महाराष्ट्रातील परिस्थिती योग्यरितीने हाताळत असल्याबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध समाजमाध्यमांवर सक्रीय राहून जनतेशी संवाद साधतात. ते राज्यातील परिस्थिती चांगल्यारितीने हाताळत असल्याच ओमर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 661च्या वर गेला असून मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details