काठमांडू -भारत नेपाळमध्ये सीमावाद सुरु झाला असताना नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. नेपाळमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दिल्लीत बैठका झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान ओली यांनी केले आहे. नेपाळने नुकतेच भारताच्या हद्दीतील महत्त्वाचे भूभाग स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले असून यासंबधीचा कायदाही पास केला आहे.
नेपाळमधील सरकार बहुमतात असून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पंतप्रधान आली यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या सभेत सांगितले. नेपाळने राज्यघटना दुरुस्त केल्यामुळे दिल्लीत बैठका होत आहेत, अशी बातमी मिळत आहे. भारत नेपाळ सरकार उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला. नेपाळचे पंतप्रधान ओली आणि एनसीपी कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्तही येत आहे.