महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2020, 5:57 PM IST

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्यदिनादिवशी नेपाळचे पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्याची शक्यता..

१५ ऑगस्टला, आपले पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटतील. ते नरेंद्र मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चाही करतील, असे वृत्त काठमांडूमधील एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

Oli may call PM Modi on I-Day: Reports
स्वातंत्र्यदिनादिवशी नेपाळचे पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्याची शक्यता..

हैदराबाद : भारत आणि नेपाळदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी नेपाळचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊ शकतात. माध्यमांमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

१५ ऑगस्टला, आपले पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटतील. ते नरेंद्र मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चाही करतील, असे वृत्त काठमांडूमधील एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

यावर्षी आठ मे रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील एका ८० किलोमीटर लांब रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले. त्यानंतर नेपाळने याचा निषेध करत, हा रस्ता नेपाळच्या भूभागातून जात असल्याचा दावा केला.

नेपाळच्या या दाव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्यातच, नेपाळने घटनादुरुस्ती करत आपल्या देशाचा नकाशा बदलला. यामध्ये त्यांनी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा असे भारतातील भाग आपल्या देशामध्ये दाखवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details