पणजी - पनवेल येथील एका युवकाकडून रेल्वे पोलिसांनी थिवी स्टेशनवर 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. लहू रामजी चव्हाण ( वय, 35 पनवेल, जि. रायगड) असे युवकाचे नाव आहे. तो लोकमान्य टिळक टर्मिनल ते करमळी गोवा दरम्यान विशेष रेल्वेतून प्रवास करत होता.
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या युवकाकडे आढळल्या २ कोटींच्या जुन्या नोटा - panvel
पनवेल येथील एका युवकाकडून रेल्वे पोलिसांनी थिवी स्टेशनवर 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. लहू रामजी चव्हाण ( वय, 35 पनवेल, जि. रायगड) असे युवकाचे नाव आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल ते करमळी ही गाडी थिवी स्टेशनवर थांबली तेव्हा रेल्वे पोलीस हेड काँन्स्टेबल विश्राम देसाई आणि डी. एस. मीना स्टेशनवर नियमीत तपासणी करत होते. तेव्हा समोरील जनरल डब्यातील एका प्रवाशाच्या आसनाखाली एक पिशवी आढळून आली. तेव्हा रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक मनोज कुमार यांना त्यांनी बोलावून घेत त्यांच्या समोर पिशवी उघडायला लावली. तेव्हा सदर पिशवीत चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा आढळल्या. यामध्ये 1 हजार रुपयांच्या 19 हजार 985 (1 कोटी 99 लाख 85 हजार) नोटा तर 500 रूपयांच्या 14 (7 हजार) नोटा होत्या. याप्रकरणी लहू चव्हाण या युवकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.