महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अत्यावश्यक वैद्यकीय वाहतुकीसाठी बंगळुरूमध्ये 'ओला'कडून 'ओला इमरजन्सी' सुरु - ओला इमरजन्सी सेवा

'मास्क आणि स‌ॅनिटायझरसह सुसज्ज असलेल्या 'ओला कार' तसेच विशेष प्रशिक्षित वाहन चालकांसह आजपासून बंगळुरूमध्ये 'ओला इमरजन्सी' सेवा उपलब्ध होत आहे' असे ओला प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Ola Emergency
Ola Emergency

By

Published : Apr 8, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - ओला कंपनीकडून मंगळवारी बंगळुरूमध्ये 'ओला इमरजन्सी' सेवा सुरु करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरूमधील २०० हून अधिक रूग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहकांची गरज नसलेल्या (कोरोनाची लागण नसलेल्या) व्यक्तींसाठी 'ओला इमरजेंसी' सेवा सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा...'मरकझ'ला गेल्याचे लपवल्यामुळे सहा विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल..

कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच अन्य प्रमुख शहरांमध्ये या श्रेणीचा विस्तार करण्याचा विचार कंपनी करत आहे. 'ओला इमरजन्सी बंगळुरूमध्ये आजपासून सुरू होत आहे. मास्क आणि स‌ॅनिटायझरसह सुसज्ज अशा मोटारींचे जाळे असलेल्या ओलाचे चालक प्रशिक्षित असून ते वाहतुक सेवा पुरवतील' असे ओला यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ओला इमरजन्सी कार बुक करण्यासाठी, वापरकर्ते त्यांच्या ओला अ‍ॅपवर 'हॉस्पिटलसाठी सक्षम' श्रेणी निवडू शकतात आणि शहरातील उपलब्ध रुग्णालयांच्या यादीमधून त्यांचे इच्छित स्थळ प्रविष्ट करू शकतात.

ओला अ‌ॅपवर 200 हून अधिक रुग्णालयांसाठी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. कॅबचा वापर केवळ अत्यावश्यक वैद्यकीय प्रवासासाठी केला आहे, याची खात्री करुन घेतली जाणार आहे. ही सेवा बंगळुरूमध्ये उपलब्ध होणार असून लवकरच अन्य प्रमुख शहरांमध्येही ते सुरू होणार आहेत, असे ओलाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा...कोरोना इफेक्टमुळे मुंबईतील अवयव प्रत्यारोपण बंदच

कर्नाटक सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्रीरामुलू यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर सर्व 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका कोविड-19 साठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे ओलाच्या इमरजन्सी सुविधेचा नक्कीच फायदा होईल.

'नागरिकांना अडचण येऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी, ओला कंपनी पुढे आली आहे. वैद्यकीय सुविधेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीतील सर्व प्रकारच्या नागरिकांना ज्यांना रुग्णवाहिका आवश्यक नसते, त्यांना रूग्णालयात जाणे यामुळे सोपे होईल. त्यामुळे गरजू नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ओला कंपनीला ही परवानगी दिली आहे, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ओला इमरजन्सी सेवेमुळे हजारो नागरिकांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाहतुक प्रवास करता येईल. स‌ॅनिटायझर कार आणि प्रशिक्षित चालक ओला कार बंगळुरूच्या नागरिकांसाठी सेवेत असेल, असे ओला प्रवक्त्यांने सांगितले. तसेच कंपनीकडून अन्य शहरांमध्ये लवकरच अशी सेवा उपलब्ध होऊल असे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details