महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशातील प्रसिद्ध पुरी जगन्नाथ रथयात्रा समाप्त

पुरीमधील रथ यात्रा देशातली सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमापैकी एक आहे. चारधाम पैकी एक असलेल्या पुरी जनग्गाथ मंदीरात ही रथ यात्रा दरवर्षी होते.

By

Published : Jul 5, 2020, 1:11 PM IST

पुरी रथ यात्रा
पुरी रथ यात्रा

भूवनेश्वर -ओडिशात मागील 13 दिवसांपासुन सुरु असलेली 'बहुडा रथ' यात्रा शनिवारी समाप्त झाली. या यात्रेला रथोत्सोव असेही म्हणतात. कोरोनामुळे या रथयात्रेला भाविकांना सहभागी होता आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने या रथयात्रेला आधी परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर नियमावलीचे पालन करण्याची अट घालत परवानगी दिली होती.

भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा 12 व्या शतकात जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात परतल्याचे प्रतिक म्हणून ही यात्रा साजरी केली जाते. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे भाविकांनी घरी राहून टीव्हीवरच धार्मिक कार्यक्रम पाहिला.

यात्रेच्या 12 व्या दिवसानंतर देवी देवतांच्या मुर्तींची पूजा केली जाते. तसेच मूर्ती मंदिरातील रत्नजडीत सिंहासनावर बसविण्यात येतात. गोटी पहांडी येथील मंदिरात रथ आल्यानंतर यात्रेचा शेवट होतो. या विधीस 'निलाद्री बिजे' असे म्हणतात. पुरीमधील रथ यात्रा देशातली सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमापैकी एक आहे. चारधाम पैकी एक असलेल्या पुरी जनग्गाथ मंदीरात ही रथ यात्रा दरवर्षी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details