भुवनेश्वर - भारताने मंगळवारी स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रात्रीची आणखी एक यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रांचा मारा करण्यास आणि जमिनीवरून जमिनीवर लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी याची चाचणी घेण्यात आली.
भारताकडून पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची आणखी एक 'नाईट टेस्ट'
भारताने मंगळवारी स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रात्रीची आणखी एक यशस्वी चाचणी झाली. हे अण्वस्त्रांचा मारा करण्यास आणि जमिनीवरून जमिनीवर लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. याची मारकक्षमता ३५० किलोमीटरपर्यंत आहे. याद्वारे ५०० ते १००० किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेता येता येतात.
पृथ्वी- २
याच ठिकाणी २० नोव्हेंबरला पृथ्वी-२चे पहिले सफल परीक्षण करण्यात आले होते. याची मारकक्षमता ३५० किलोमीटरपर्यंत आहे. तसेच, या क्षेपणास्त्राद्वारे ५०० ते १००० किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेता येता येतात. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने ही चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राचा भारतीय संरक्षण दलात २००३ साली समावेश करण्यात आला होता. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली हे परीक्षण करण्यात आले.