भुवनेश्वर - ओडिशा सरकारने राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता जून महिन्यात 11 जिल्ह्यांत ‘विकेंड शटडाऊन’ जाहीर केला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत. गंजम, नयाग्रह, कटक, जगतशिंगपूर, केंद्रपाडा, जयपूर, भद्रक, बालासोर आणि बालनगिरी जिल्ह्यांमध्ये हा बंद असणार आहे, मात्र, अत्यावश्यक सेवांना सुट असणार आहे.
ओडिशा सरकारचं 'विकेंड शटडाऊन'; 31 जुलैपर्यंत शैक्षणिक संस्था बंद
जून महिन्यात सर्व सरकारी कार्यालये शनिवार आणि रविवार बंद राहणार आहेत. मात्र, पोलीस, अग्निशामक दल, स्वच्छता विभाग, दुरसंचार या सेवा सुरु राहणार आहेत.
तसेच राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि इतर शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. राज्याच्या जनसंपर्क विभागाने यासंबंधीची माहिती पत्रक जारी करून दिली.
जून महिन्यात सर्व सरकारी कार्यालये शनिवार आणि रविवार बंद राहणार आहेत. मात्र, पोलीस, अग्निशामक दल, स्वच्छता विभाग, दुरसंचार या सेवा सुरू राहणार आहेत. 31 जुलैपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्या तरी जाहीर करण्यात आलेल्या परिक्षा कन्टेन्मेंट झोन सोडून इतर भागात होणार आहेत. भुवनेश्वर महापालिका क्षेत्रातील सर्व पार्क, गार्डन आणि बगीचे सुरू करण्यात आले आहेत.