नवी दिल्ली - फनी चक्रीवादळ पुनरुत्थान उपायांचा एक भाग म्हणून ओडिशा सरकारने पुरी जिल्ह्यातील सर्व घरांना मोफत सॅनेटरी नॅपकिन्स वितरित करण्यात आले आहेत. पुढील २ महिन्यांकरिता हे नॅपकिन्स वाटण्यात येणार आहेत.
फनी चक्रीवादळ : ओडिशा सरकारकडून पुरीमध्ये विनामूल्य सॅनेटरी नॅपकिन्सचे वितरण - वितरण
ओडिशा सरकारने पुरी जिल्ह्यातील सर्व घरांना मोफत सॅनेटरी नॅपकिन्स वितरित केले आहेत.
ओडिशा किनाऱ्यावर ३ मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील १ कोटी ६५ लाख लोक प्रभावित झाले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने योग्य ती मदत पोहोचवून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले. आता सरकारकडून महिलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी पुरी जिल्ह्यात मोफत सॅनेटरी नॅपकीन्सचे वाटप करण्यात येत आहे. सरकारने पुरी जिल्ह्यात आतापर्यंत २४ लाख सेनेटरी नॅपकिन्सचा मोफत पुरवठा केला आहे, अशी माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे.