भुवनेश्वर -ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी पुराने बाधित झालेल्या हैदराबाद आणि तेलंगणाच्या काही भागांत मदतकार्य करण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी ट्वीट केले, की 'माननीय मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हैदराबाद/तेलंगाणातील पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.'
प्राथमिक अंदाजानुसार, पाऊस आणि पुरामुळे शासनाचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही सोमवारी हैदराबाद व आजूबाजूच्या पुरामुळे बाधित झालेल्या प्रत्येक घराला तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली. पाऊस आणि पूरात पूर्णपणे नुकसान झालेल्या सर्व घरांना एक लाख रुपयांची मदत आणि अर्धवट नुकसान झालेल्या घरांमध्ये राहणाऱ्या सर्वांना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा -पाकने हाफिज सईद आणि सलाहुद्दीनला सांगितले, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पाठवा?
'हैदराबादमध्ये इतका पाऊस झाला आहे, जो गेल्या 100 वर्षात कधीच पाहिला नव्हता. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्या लोकांना, विशेषत: गरिबांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना मदत करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. म्हणूनच, आपण निम्न भागात राहणाऱ्या गरीब घरातील प्रत्येक घराला तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे,' असे मुख्यमंत्री म्हणाले.
गरिबांच्या मदतीसाठी शासन पालिका प्रशासन विभागाला तातडीने 550 कोटी रुपये जाहीर करीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर वित्त विभागानेही विभागाला 550 कोटी रुपये जाहीर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली होती.
13 ऑक्टोबरपासून राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) हद्दीतील 33 जणांसह एकूण 70 जणांचा बळी गेला आहे.
हेही वाचा -पतीला दरमहा पोटगी देण्याचा न्यायालयाचा पत्नीला आदेश